
उदगीर/कमलाकर मुळे :
येथे जळकोट तहसील कार्यालयाकडून दि.४ मंगळवार रॊजी अतनूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ॲग्रीस्टॅक मोहिमेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी बनविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ही मोहीम जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे, कृषी अधीक्षक, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर मध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करून देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. सदर शिबीराला अतनूर, चिंचोली, गव्हाण, मेवापूर, मरसांगवी, शिवाजीनगर तांडा व रावणकोळा येथील शेतकऱ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. सदर शिबीराला जळकोट चे तहसीलदार राजेश लांडगे यांनी भेट दिली. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, मंडळ अधिकारी हंसराज जाधव, कृषी पर्यवेक्षक नाना धुप्पे, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील-गव्हाणे, अतनूर सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी अतिक शेख तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रमोद सूर्यवंशी, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आकाश पवार, माधव कवडेकर, महादेव पाटील, नागेश हरणे, बळेराज बर्गे, अतनूर येथील विकास सोमूसे-पाटील, माझी सैनिक अय्युब शेख, माजी सैनिक इस्माईल मुंजेवार, माजी सरपंच रमेश बोडेवर, ईश्वर कुलकर्णी, मेवापूरचे मारोती पाटील, परमेश्वर पाटील, चिंचोलीचे माजी सरपंच संतोष बट्टेवाड, गव्हाणचे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त गणेश रेकुळवाड, मरसांगवीचे मोईनउद्दीन पटेल, रावणकोळाचे मंगेश हुंडेकर, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर आदी उपस्थित होते..
Discussion about this post