
प्रविण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी मो. 7798767266
उमरखेड – दहागाव येथील महिलांनी एकत्र येऊन अनेक वर्षापासून संघर्षाला रुळावर आणत,, साहेब आता तरी आम्हाला स्मशानभूमी द्या,,
म्हणत तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून ठराव घेऊन आम्हाला स्मशानभूमी द्यावी अशी मागणी गावातील महिलांच्या माध्यमातून करण्यात आली.
कुठल्याही गावामध्ये जा तिथे नदी किंवा ओढ्याच्या कडेला एक तरी स्मशानभूमी असतेच.
राज्यात अनेक गाव कशी आहेत. जिथे अद्याप पाण्याची किंवा विजेची सोय पोहोचलेली नाही. पण तिथे स्मशानभूमी मात्र आहे कारण माणसाच्या मृत्यू नंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र महाराष्ट्रामध्ये असं गाव जिथे स्मशानभूमीच नाही दहागाव अस या गावाचं नाव असून सुरुवातीपासूनच या गावात स्मशानभूमी नाही त्यामुळे या गावात कुणाचा निधन झाल्यास नाल्याच्या किनारी उघड्यावरच त्याचे अंतिम संस्कार केले जातात.
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हीच परिस्थिती आहे जसं म्हणतात की एखाद्याला जिवंतपनी कितीही कठीण प्रवास करावा लागत असले. तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा. मात्र अद्यापही त्यांना स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही. ही शोकांतिका काही महिलांनी समोर मांडली.
आतापर्यंत गावातील नागरिक हे नाल्याच्या ठिकाणी असलेल्या पांदण रस्त्यावर अंत्यविधी करत होते परंतु ते अंत्यविधी करत असताना पाऊस आला तर गुडघ्या इतक्या चिखलातून जावं लागत. पावसाने जोर धरला तर बॉडी अर्धवट जाळून पुराच्या पाण्यात हाडके वाहून जातात.
अशी परिस्थिती पावसाळ्यात निर्माण होते. त्यामुळे दहागाव वासियांच्या नशिबी मृत्यू नंतरचा प्रवासही कठीण असल्याचं म्हणावं लागेल.
दरम्यान,स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. शासनाकडे वेळोवेळी या समस्येबाबत लेखी निवेदन देऊन.स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी केली आहे. मात्र आजपर्यंत दहागाव स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही.
देशात लोकशाही येऊन इतके वर्षे झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारासाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नाही अशा शब्दात येथील ग्रामस्थ महिलांनी आपला संताप्त व्यक्त केला.
. गावात स्मशानभूमी असल्यास आता लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण निवेदन देऊ असे म्हणत आमदार किसनराव वानखेडे यांना निवेदन देण्याचे ठरले. परंतु ते अधिवेशन असल्याकारणाने उपस्थित नसल्यामुळे गरिबांचे कैवारी व जनतेचे पुढारी असणारे भाजप यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या घरी जाऊन महिलांनी निवेदन दिले.
चौकट–:
संपूर्ण जिल्ह्यात जनतेचे लाडके भाऊ म्हणून ओळख असणारे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा त्यांच्या घरी गेले असता असे समजले की, तेही मुंबई या ठिकाणी गेले आहेत
त्यामुळे महिलांनी तिथून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला परंतु घरातून त्यांच्या पत्नीने आवाज देत सर्व महिलांना थांबवले.
जिल्हा समन्वयकाची पत्नी असण्याचा कुठल्याही अभिमान न बाळगता प्रेमळ व हसरा स्वभाव असणाऱ्या ताईंनी सर्व महिलांच्या बरोबरीने पायरी वरती बसून त्यांच्यासोबत अगदी हसत खेळत बोलून सर्व महिलांचे मन जिंकून घेतले व महिला करत असलेल्या कार्याचा आदर करत सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केली. साहेबांना तुम्ही करत असलेली स्मशान भूमीची मागणी मी नक्की सांगेल आणि तुम्हाला तुमच्या हक्काची स्मशानभूमी मिळवून देण्यासाठी तुम्ही करत असलेल्या कार्यात आम्ही नक्कीच सहकार्य करू असे त्यांनी सांगितले..
Discussion about this post