डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य द्वरावर आरंभले उपोषण
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा :- तालुक्यातील गव्हा ह्या गावचे निवासी ८० वर्षे पार केलेले वयोवृद्ध नागरिक जगदीश गोविंदराव देशमुख यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या अन्यायकारक व हेकेखोर धोरणामुळे आपल्या हक्काच्या मंजूर वेतनश्रेणी तथा थकीत देय रक्कम मिळावी यासाठी प्रचंड उन्हाच्या दिवसात उपोषण करण्याची पाळी आली आहे.
गव्हा येथील जगदीश देशमुख हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील ग्रंथालयामध्ये ग्रंथालय सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
देशमुख यांच्या सेवा कालावधीत दि.०१.१०.९४ पासून १४०० ते २३०० आणि दि.०१.०१.९६ पासून ४५०० ते ७००० एवढी शासन निर्णयानुसार मंजूर वेतनश्रेणी कृषी विद्यापीठ प्रशासनाने मंजूर करून थकबाकी सह देण्यासाठी निवृत्तीनंतर असंख्य वेळा लेखी निवेदन देऊन तथा संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटून वारंवार निदर्शनास आणून देऊनही सेवा अंतर्गत केलेल्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप उपोषणकर्त्या वयोवृद्ध नागरिकांनी निवेदनामध्ये नमूद केला आहे.
शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेगवेगळे आजार जडलेले असल्याने त्यांचा निवृत्ती काळ आर्थिक विवंचनेत जाऊ नये यासाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना केंद्र व राज्य सरकार राबवित असताना तालुक्यातील नागरिकाला सेवा अंतर्गत केलेल्या नोकरी दरम्यानच्या हक्काच्या शासकीय देय रकमेपासून विद्यापीठ प्रशासन वंचित ठेवून थकलेल्या वयात उपोषण करायला लावीत असल्याने
आश्चर्य व संताप व्यक्त केले जात आहे.

Discussion about this post