पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी मानवत येथील रहिवासी तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रदेश सचिव अहमद अन्सारी रा.टिपू सुलतान चौक मानवत हे आपल्या मुलाच्या शिष्यवृत्तीचे खाते उघडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आठवडी बाजार मानवत येथे गेले असता तेथील मॅनेजरने खाते उघडण्यासाठी फॉर्म न देता ग्राहक सेवा केंद्राकडे जा असे
म्हणून फॉर्म दिला नाही सदरील तक्रारदाराने वारंवार विनंती केली असता मॅनेजरने फॉर्म दिला व फॉर्म भरून दिला असता आज या उद्या या असे टाळाटाळ करून खाते उघडण्यास दीड महिना विलंब लावला फॉर्म भरल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर खात्याविषयी विचारणा केली असता असिस्टंट मॅनेजर म्हणाले की सध्या बँकेत कर्मचारी नाहीत ,
काहीजण सुट्टीवर आहेत ,मी काय एकट्याने गुत्ते घेतले आहे का? खाते उघडण्याचे काम माझे नाही ते काम क्लार्कचे आहे त्याचे काम मी करू का? मी तिथेच उभे राहिल्याने सदरील असिस्टंट मॅनेजरने तुम्ही माझ्या डोक्यावर उभे राहू नका म्हणत सेक्युरिटी गार्डला बोलावून याला बँकेच्या बाहेर काढा असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली.
या अपमानास्पद वागणुकी विरोधात तक्रारदार अहमद अन्सारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालया पुढे संबंधित बँक कर्मचाऱ्या विरोधात कारवाई होण्यासाठी आमरण उपोषण केले दिनांक 21-1- 25 व 22- 1-25 या रोजी उपोषण केले विभागीय आयुक्त
कार्यालयाने जिल्हाधिकारी जिल्हा अग्रणी बँक यांना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे पत्र अहमद अन्सारी यांना व जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँक यांना दिले परंतु जिल्हा अग्रणी बँकेने त्यावर आज पर्यंत कुठलीही कारवाई न करता विभागीय
आयुक्त तसेच जिल्हाधिकारी अग्रणी बँकेच्या कारवाई पत्राला एक प्रकारे तेरा ची टोपली दाखवली. तरी संबंधितांवर लवकरात लवकर त्वरित कारवाई व्हावी नसता आझाद मैदान मुंबई येथे पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्याचा मानस असल्याचे अहमद अन्सारी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
Discussion about this post