पारध-पद्मावती रोडवर अपघात,पत्नी गंभीर पिंपळगाव रेणुकाई,पुढारी वृत्तसेवाःभोकरदन तालुक्यातील पारध- पद्मावती रोडवर शेतातुन घरी परत जाणार्या पती-पत्नीच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाला.गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील शेतकरी पती -पत्नी शेतातुन दुचाकी( क्र.एमएच -28- एक्यु-3525 )वरुन जात असतांना दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या ट्रक( क्र.एमएच- 20 ईजी -6041 )ने धडक दिली . या अपघातात दुचाकीवरील अशोक किशन शेवाळे (65) हे ठार झाले तर पत्नी सुगंधाबाई अशोक शेवाळे (60)या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती..
Discussion about this post