अकिवाट येथील मागासवर्गीय समाजातील गटारी पुर्ण पणे बंद अवस्थेत आहेत. समाजातील शौचालयाच्या सांडपाण्याचा तसेच इतर सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरलेली आहे . डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून डेंग्यू , मलेरिया यासारख्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये लहान मुलांना तसेच वयोवृध लोकांना त्रास सोसावा लागत आहे.
मागील चार वर्षापासून गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार निवेदन देवून तसेच गावसभेत विषय मांडून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेली चार वर्ष ग्रामपंचायतचे कर्मचारी सुद्धा स्वच्छतेसाठी आले नसल्याचे दिसून येत आहे. १५ दिवसात गटारीचे कामकाज पूर्ण न झाल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देवून शौचालयाच्या सांडपाण्याचा निचरा तसेच इतर सांडपाण्याचा निचरा नाईलाजास्तव रस्त्यावरती करावा लागेल अशी मागणी ग्रामस्थामधून व्यक्त होत आहे.
शासनाकडून मिळलेला १४ वा वित्त आयोग , १५ वा वित्त आयोग तसेच मागासवर्गीय यांना मिळणारा १५ % निधी कोठे खर्च केला हा प्रश्न ग्रामस्था मधून व्यक्त होत आहे .
Discussion about this post