सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये सध्या पदोन्नतीचे वारे वाहताना दिसत आहे. काही शिफारशीनुसार आणि नियम डावलून पदोन्नती झाल्याची चर्चा गेली काही दिवस सुरु होती आज महापालिकेमध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांनी या संदर्भात बैठक घेऊन स्पष्ट केले कि पात्रतेचे निकष पाहूनच पदोन्नती देण्यात येणार आहे वशिलेबाजी आणि नियम डावलून पदोन्नती होणार नाही यामध्ये सेवा जेष्ठतेच्या यादीच आणि सेवा जेष्ठतेचा विचारही केला जाईल. सेवा नियमावलीतील तरतुदींचा अभ्यासही या प्रकरणी केला जाईल. आयुक्तांच्या या निर्णयामुळे वशिलेबाजी करणारे अधिकाऱयांना चांगलीच चपराक बसली आहे. सध्या ज्यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिली गेली असेल किंवा नेमणूक झाल्या असतील त्या रद्द होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात आणखी एक बैठक होणार आहे. गेले काही दिवसांपासून महापालिकेमध्ये काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ‘लॉबी’ पदोन्नती संदर्भात सक्रिय झाल्याची चर्चा सुरु होती मात्र आता आयुक्तांच्या या निर्णयामुळे या चर्चाना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
Discussion about this post