
सांगोला / वृत्तवेध :
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. यापार्श्वभूमीवर रविवार दि. ९ मार्च रोजी सांगोला बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाज सांगोला तालुका यांच्यावतीने पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या समाजविघातक व दोन समाजात तेड निर्माण होईल असे कृत्य घडत आहे. यामध्ये बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना
फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक ९ रोजी सांगोला बंद व विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज सांगोला तालुका यांच्याकडून सांगोला बंदची हाक ही देण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सांगोला शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post