विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूर : मोटारसायकलवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सुभाष जगन्नाथ मगर (६३, रा. खंडाळा) असे या घटनेतील मयताचे नाव आहे. मगर हे २१ फेब्रुवारी रोजी रात्री मोटारसायकलवरून घराकडे येत होते. त्यावेळी ते मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाटी पोलीस चौकीचे सहायक फौजदार लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार पवार हे करीत आहेत.
Discussion about this post