
शिराळा / प्रतिनिधी..
बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी झालेल्या कामगारांना व्यक्तीगत लाभांचे सामृग्र अनुदान एक महीन्याच्या आत मिळावे व बांधकाम कामगांरासाठी अटल घरकुल योजने चा प्रभावी अंमल बजावणी करावी अशी मागणी अर्थसंकल्पी अधिवेशनात तारांकित प्रश्न शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी मांडली. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे सांगितले.
विधिमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशनात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत व सोयी मिळण्याबाबत आमदार सत्यजित देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असणारे कामगार यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. अटल घरकुल योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी जेणेकरून त्या कामगारांना आपल्या हक्काचे घर मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थी शिष्यवृत्ती, अपघात खर्च,अपघाती मृत्यूचा खर्च, वैयक्तिक लाभाचा खर्च, वैयक्तिक निधी, विधवा पत्नीला मिळणारे अनुदान हे अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित लाभार्थ्याला मिळावे. तसेच दिल्ली व गुजरात सरकारने ज्या पद्धतीने स्वयंघोषणा पत्रावर बांधकाम कामगारांना ग्राह्य धरले आहे. त्याच पद्धतीने आपल्या सरकारने देखील स्वयंघोषणा पत्रावरती बांधकाम कामगार ग्राह्य धरण्यात यावा जेणेकरून बांधकाम कामगारांना मदत होईल. अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केली..
Discussion about this post