
शिरुर तालुका प्रतिनिधी:-
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा सेनेच्या शहर प्रमुखपदी अमोल हेमंत लुनिया व उपशहरप्रमुख आविष्कार संभाजी लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, जिल्हाप्रमुख उल्हासजी तुपे , तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, संपर्कप्रमुख गितांजलीताई ढोणे, उपजिल्हाप्रमुख शरद नवले, अनिल काशीद, शहरप्रमुख मयूर थोरात आणि संघटक निलेश गाडेकर यांच्या हस्ते अमोल लुनिया यांना प्रदान करण्यात आले.ही नियुक्ती संपर्कमंत्री मा. उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या विश्वासाने करण्यात आली आहे. अमोल लुनिया यांच्यावर पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून हिंदुत्ववादी विचारसरणी मजबूत करण्याची व संघटनेचे बळ वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीमुळे शहरातील युवा सेनेच्या कार्याला गती मिळेल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. शहरभरातून आणि शिवसैनिकांकडून अमोल लुनिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युवा सेनेत नव्या जोशासह नेतृत्वाची नवी उमेद! युवा सेनेच्या विकासासाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!


Discussion about this post