
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.
अर्ज कसा करायचा : या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च २०२५ आहे. या अंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल या सोबतच त्यांना दरमहा ५००० रुपयेही मिळतील या शिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर ६००० रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.
या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांना इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.अशी माहिती देऊन समाजातील गोरगरीब आर्थिकदृष्ट्या गरीब गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे..
Discussion about this post