
प्रतिनिधी / शिराळा..
आष्टा येथील नागांव रस्त्यालगत असणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे १०० कुटुंबांना नागरी सुविधाबाबत देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या मागणी साठी दलित महासंघाच्या(वायदंडे गट) वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवशी पाल ठोक आंदोलन करण्यात आले.
सकाळी पाल ठोकून आंदोलन सुरु करण्यात आले आंदोलकांनी दिवसभर घोषणाबाजी करून तहसील परिसर दणानून सोडला.
आंदोलनाचा धसका घेत नगरपरिषद व महावितरण प्रशासन कमाला लागल्याचे दिवसभरात पहायला मिळाले.रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राजशेखर लिंबारे यांनी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर यांची आंदोलकाबरोबर बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.
सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्या वतीने जुलै २०२४ ला केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीतील वीज कनेक्शनसाठी महावितरणने ८ लाख ८६ हजार रुपये मंजूर केलेले आहेत त्याची मान्यता मिळून काम सुरु होईपर्यंत गरजेनुसार तात्काळ वीज कनेक्शन देण्याचे लेखी पत्र महावितरणचे अमित पाटणकर यांनी दिले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शौचालयाची स्वछता करून नविन दरवाजे बसवण्यात आले,जुन्या पाईपलाईन ची दुरुस्ती करण्यात आली तसेच नविन पाईपलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे,कचरा गाडी पाठवणे,शौचा लयांची वेळोवेळी साफसफाई व औषध फवारणी करणे,पाणी कमी पडत असल्यास टँकरणे पाणी पुरवठा करणे, नविन फिरते शौचालयासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र नगरपरिषदेचे रघुनाथ मोहिते यांनी दिले.
झोपडपट्टीतील सुविधेबाबत अनेक मागण्या मान्य होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे तसेच काही मागण्याबाबत महावितरण व नगरपरिषदेने लेखी पत्र दिल्याने सदर पाल ठोक आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी केली.
दुसऱ्या दिवशी आंदोलनामध्ये प.महा अध्यक्ष अशोकराव गायकवाड,प.महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे,युवक आघाडी प. महा अध्यक्ष सुनिल मोरे सर,कामगार आघाडी प. महा अध्यक्ष संभाजी मस्के,वाळवा ता.अध्यक्ष नारायण वायदंडे, आष्टा शहर अध्यक्ष राजेंद्र घस्ते,आष्टा शहर उपाध्यक्ष अमोल लोखंडे, भटक्या जाती जमाती आघाडीचे गुलाब सय्यद,राजेंद्र वायदंडे, संदीप अवघडे, तुळशीराम बागडी, पप्पण बागडी यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष व महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post