
शिराळा / प्रतिनिधी..
वाळवण करणाऱ्या महिला उद्योजिकांसाठी आपला उद्योगाचीवाढ व्हावी,बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सहकार भारती सांगली महानगर, जिल्हा सहकार भारती (ग्रामीण) आणि रणरागिणी प्रभाग,कवलापूर यांच्या मार्फत दिनांक २२ व २३ मार्च या काळात पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सहकार भारतीचे जिल्हाघ्यक्ष सुमंत महाजन व महिला प्रमुख सारिका मुळे यांनी दिली.
सांगली जिल्हा सहकार भारती (ग्रामिण) च्या कार्यकारणीची बैठक श्री दत्त नागरी पत संस्थेच्या स्वर्गीय जी.एस.कुलकर्णी सभागृहात पार पाडली.संस्थेचे कार्यलक्षी संचालक महेश कबाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.विभाग प्रमुख चंद्रकांत धुळप यांनी भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगुन सर्वांना मार्गदर्शन केले.यावेळी महिला प्रमुख सारिका मुळे यांनी पापड महोत्सवाची माहिती दिली त्या म्हणाल्या की लघुउद्योग करणाऱ्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतुने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ व २३ मार्च रोजी कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक सांगली हा महोत्सव होणार असुन प्रायोजक आदि अरिहंत को-ॲाप क्रेडीट सोसायटी हे आहेत असे सांगुन त्या म्हणाल्या की यामध्ये नवीन उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना माहिती दिली जाणार आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक गटाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.उत्कृष्ठ गटाचा यथोचित करण्यात येणार आहे असे सांगून भाग घेणाऱ्या गटांनी सारिका मुळे ९५६१४९८२८४,संपदा आरवाडे ८३२९९६२६८६ व उत्कर्षा लाडे ९८८१०३३७७० या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन केले.प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी या महोत्सवात प्रत्येक तालुक्यातून सहभाग अपेक्षित आहे असे सांगुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहेत त्यामुळे सहकार भारती प्रत्येक तालुक्याच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगुन कामाबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हा अध्यक्ष सुमंत महाजन म्हणाले सहकार भारतीचे काम वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सक्षम तालुका कार्यकारिणी करणे गरजेचे आहे त्यामुळे १० एप्रिल पर्यंत सर्व तालुक्याच्या कार्यकारिणी व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे सांगितले.पुढील जिल्हा कार्यकारिणीची बैठक १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार असे सांगितले.या बैठकीला सौ.अश्वीनी आठवले, महामंत्री भारत निकम,संग्राम कुलकर्णी, चंद्रकांत खंकाळे,अजितराव खराडे,आनंदराव निकम,विठ्ठल निकम,बाळासाहेब पाटील,सौ.स्नेहलता कुलकर्णी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते..
Discussion about this post