कवठेमहांकाळ येथे एका परप्रांतीय तरुणाने सहा वर्षीय बालकाला कुरकुरे आणि पैशांचे आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी, घरी कोणी नसताना, लोकेन केवलराम कासले (वय 21, रा. मध्यप्रदेश) याने बालकावर अत्याचार केला. बालकाने त्रास झाल्याने पालकांना हा प्रकार सांगितला, त्यानंतर रुग्णालयात तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
पालकांच्या फिर्यादीवरून पोकसो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कासले सध्या पसार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे..
Discussion about this post