
उदगीर : कमलाकर मुळे :
इंग्रजी माध्यमातून नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या रेनबो पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना सोक्षणासोबताच नावीन्यपूर्ण विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेमध्ये दिनांक 06-03-2025 रोजी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध बालरोगतंज्ञ मा.श्री. चामवाड सर व मा.श्री. नवनाथभाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग बनवून सादरीकरण केले, व स्वतः तयार केलेल्या प्रयोगाची मांडनी करुन माहीती सांगीतली.
या वेळी प्रमूख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी उदगीर शहराध्यक्ष श्री.बाबा पाटील सर, श्री. कमलकिशोर राजूरकर सर व श्री. शिवाजी मानकोळे सर आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post