

——————————- प्रा. दिलीप नाईकवाड
सिंदखेडराजा /तालुका प्रतिनिधी..
समर्थ कृषी महाविद्यालयातील परिसरात लागलेली आग
विझवण्यासाठी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले, अग्निशामक दलाची मदत मिळेपर्यंत समर्थ कृषी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक यांनी आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमांतर्गत प्राथमिक स्तरावर आग
विझवण्यासाठी प्रयत्न केले.अग्निशामक दल उपस्थित झाल्यावर आग नियंत्रणात आली.
सदर घटना एका शेतकऱ्याने शेतामध्ये काळी कचरा जाळण्यासाठी लावलेल्या आगिने अचानक भीषण रूप धारण केले व आग ही समर्थ कृषी महाविद्यालयाच्या परिसरात लागली तरी शेतकऱ्यांनी शेतातील काळी कचरा जाळतांना ती आग इतरत्र पसरणार नाही व कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, किंवा काडी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा पिके आहेत त्याची हानी होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहत्रे यांनी केले. अग्निशामक दलाचे भगवान मापारी, संदीप सुनगत, दत्ता मंडळकर , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहत्रे, रासेयो अधिकारी किरण ठाकरे प्रा.सोळंकी, प्रा.देशमुख, संजय लाड, गबाजी लाड, संजय पडघन, मुख्यदल, भालेराव व रासेयो स्वयंसेवक तसेच समर्थ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताठे, डॉ.सीताफळे, डॉ.लड्डा, डॉ. घुबे, पुरुषोत्तम शेरे, प्रा.चऱ्हाटे यांनी आग विझवण्यासाठी मदत केली..
Discussion about this post