शशिकांत तांबे – देवळा प्रतिनिधी –
ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. यात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला दाम मिळत नाही.माळवाडी आणि फुले माळवाडी गांवासह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह व भविष्य बघत आहे. यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही.
दैनंदिन गरजा व खासगी, तसेच सरकारी बॅंकाची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने संपूर्ण गाव विकण्याच्या मन : स्थितीत नागरिक आले आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि कर्ज फेड करण्याइतपत उत्पन्न मिळावे.यासाठी शेत मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकारनेच विकत घ्यावे,आशी मागणी प्रविण बागुल,अमोल बागुल, राकेश सोनवणे आदी शेतकऱ्यांनी केली आहे .
सरकारचे शेतीचे धोरण पुर्णपणे चुकीचे असुन, कांद्यासह कोणत्याही शेत मालाला भाव मिळत नसल्याने प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे . त्यातुनच माळवाडी येथील टोकाचा शेतकऱ्यांनी गाव विक्रीचा टोकाचा निर्णय घेतला असावा..
Discussion about this post