
किरण पाठक अमळनेर :
अमळनेर :
मारवड अमळनेर येथील मयंक जगदीश साळुंखे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्रात १३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मयंक हा शहरातील सेंट मेरी शाळेचा विद्यार्थी असून या परीक्षेत तो अमळनेर केंद्रात पहिला तर जळगाव जिल्ह्यात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तो जि. प. प्राथमिक शिक्षिका नयना साळुंखे व मारवड येथील कै. न्हानाभाऊ म.तु. पाटील कला महाविद्यालयातील मुख्य लिपिक जगदीश साळुंखे यांचा चिरंजीव आहे तसेच श्री.सुरेश भिमराव शिंदे संचालक,ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड यांचे नातू. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
Discussion about this post