
स्त्री ही कितीही आधुनिक झाली तरीही, तिच्या मनातील प्रेम, माया, करुणा अजूनही तश्याच आहेत, ती प्रत्येक भूमिकेत अगदी परखडपणे बसते, मग ती विद्यार्थिनी असो की शिक्षिका, आई असो वा मुलगी, ह्याच नात्यांना जपून ठेवण्यासाठी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली येथे, महिला दिवसाचे औचित्य साधून शाळेच्या मैदानात,महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील नामवंत, थोर महिलांची वेशभूषा सकारून त्यांना मानवन्दना दिली, तसेच विदयार्थ्यांनी आपल्या शिक्षिका बद्दल कृतघ्नता व्यक्त केली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.खोब्रागडे सर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सौ धरमशारे मॅडम व कौशल्य विकास अंतर्गत कु रेहपाडे मॅडम ह्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि.रुद्रा बाभरे व आभार प्रदर्शन चि.अक्षर माटे यांनी केले, विदयार्थी मनोगत व प्रसाद वाटपानंतर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले..
Discussion about this post