


यावल प्रतिनिधी फिरोज तडवी..
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावल तहसील कार्यालयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून यावल तहसील कार्यालयामध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन ओम शांती च्या राजश्री दीदी यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पुढाकार घेऊन हिरकणी कक्ष सजवून महिलांसाठी सर्व सुविधा त्यात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय व महिलांना सर्व ज्या दैनंदिन सुविधा हव्यात त्या ठिकाणी महिलांना या हिरकणी कक्षाचा लाभ घेता येईल. खेड्यापाड्यावरून अनेक महिला तहसील कार्यालयात कामासाठी येतात एखाद्या वेळी त्यांना थकवा जाणवला किंवा उन्हाळा पावसाळा यात अडचणी असल्यास या ठिकाणी दुपारच्या वेळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत त्याचा उपयोग घेता येईल यावेळी शहरातील लाडक्या बहिणी व महसूल प्रशासनातील तलाठी वर्ग उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तहसील कार्यालयाचे सर्व स्टाफ ने परिश्रम घेतले..
Discussion about this post