
शिरूर तालुका प्रतिनिधी:-
प्रसिद्ध उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते मा. प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष दिनाचे औचित्य साधत, स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या ८६ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये तब्बल १२४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा मोठा आदर्श घालून दिला. ८६ भाग्यवान विजेत्यांना सायकल वाटप
या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या दात्यांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने ८६ भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. या विजेत्यांना मा. प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानपूर्वक सायकल वाटप करण्यात आले. शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशभाऊ धारीवाल मित्रमंडळ, शिरूर शहर आणि पंचक्रोशी यांच्या वतीने करण्यात आले.
समाजसेवा व सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
उद्योगपती स्व. रसिकभाऊ धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उदात्त हेतूने हजारो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. स्तुत्य उपक्रम ठरला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रकाशभाऊ धारीवाल मित्र मंडळ, शिरूर शहर व पंचक्रोशी यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Discussion about this post