न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर काॅलेज उंदरगाव येथे महिला दिन उत्साहात साजरा
सोलापूर प्रतिनिधी
दिनांक – ०८.०३.२०२५
आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज उंदरगाव येथे “जागतिक महिला दिन “उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर मान्यवरांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी प्राप्त केल्याबद्दल कु.कनिष्का साठे यांचा शाळेच्या वतीने आणि उंदरगाव महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच श्रीमती रतनताई लवटे व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागातील डाॅ.स्वाती खांडेकर मॅडम,कु.डॉक्टर कनिष्का साठे, ग्रामपंचायत सदस्य सौ. मयुरी नाईकवाडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. पुजा नाईकवाडे, महिला बचत गट अध्यक्षा सौ. राणी आरे, तसेच मानव सुरक्षा सेवा समिती तालुका अध्यक्ष सोपान चव्हाण व कायदेशीर सल्लागार गणेश चव्हाण तसेच उंदरगावाचे ग्रामसेवक धर्मे साहेब या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच उंदरगाव येथे उमेद अभियान बचत गट, भगिनी, माझी विद्यार्थींनी सर्व महिलांचा शाळेच्या मार्फत सत्कार करण्यात आला.
महिला दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थीनी कु. नम्रता चव्हाण, अपर्णा तांबिले व महिला यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच डॉ. स्वाती खांडेकर , डॉ. कु. कनिष्का साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला या कोणत्याही क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य
करू शकतात. समाजामध्ये आपले अस्तित्व निर्माण करू दाखवायला हवे. तसेच विद्यार्थींना मनोगत व्यक्त करताना इंग्रजी मध्ये मनोगत व्यक्त केले तर सराव होईल.
विद्यार्थी बहुमोल्य मार्गदर्शन केले. तसेच महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
व प्रशालेचे प्राचार्य श्री. विजय साठे सर यांनी आपल्या मनोगतामधुन महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे तसेच उंदरगाव मधुन आले सर्व महिला भगिनींना व विद्यार्थींना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती महामुनी मॅडम यांनी केले. श्रीमती चव्हाण मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Discussion about this post