प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाड
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकांचा वापर होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाचे धडे मिळणे आवश्यक आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल. हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक श्री. संजय यादव यांनी आयसीटी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले असून समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद शाळांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा होत आहे. आधुनिक तंत्रांचा वापर करून नेहमीच्या विषय शिकवण्यासाठी व विद्यार्थ्यांची रुची वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल असे मत श्रीमती जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी(प्रा.) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी व्यक्त केले आहे. तसेच या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
Discussion about this post