निपाणी वडगाव, अशोकनगर (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर)
रामराव आदिक पब्लिक स्कूल, निपाणी वडगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महिलांच्या हक्कांवर चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप वैराळ सर यांनी केले, तर कु. स्नेहा गुंड हिने महिला दिनाच्या महत्त्वावर माहिती सादर केली. या वेळी शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री. प्रसाद मुंडलिक सर, तसेच अविनाश वाघ सर, आबासाहेब जाधव सर, येवले सर, महेश खंडागळे सर, भडकवाड सर, पटेल सर, अंगराखे सर यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षणातील योगदान आणि समाजातील भूमिकेवर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
Discussion about this post