जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांच्या वतीने महिला दिनाचे आयोजन
महाबळेश्वर – प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा ही शिक्षकांची अर्थवाहिनी असणारी बँक विविध उपक्रमांचे आयोजन करत असते बँकेच्या वतीने 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाखा महाबळेश्वरच्या वतीने सभासद ठेवीदार व महिला शिक्षिका यांच्यासाठी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पाचगणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ लक्ष्मी कराडकर मॅडम महाबळेश्वरचा तहसीलदार सौ तेजस्विनी खोचरे पाटील मॅडम,महाबी फाउंडेशनच्या संस्थापिका व वकील सौ.रेणुका ओंबळे मॅडम. महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री सुरेंद्र भिलारे ,केंद्रप्रमुख संजय पार्टेसर,वरिष्ठ मुख्याध्यापक श्री.जनार्दन कदम सर व शाखाधिकारी विलास वाडकर, कुरेशी मॅडम हे मान्यवर उपस्थित होते
महिला सबलीकरण व सक्षमीकरण यासाठी महिलांनी स्वतःहून पुढे येऊन आत्मविश्वास पूर्ण काम करत राहिले पाहिजे. समाजात महिलांना मानसन्मान मिळतो आहे तो अधिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे असे मत लक्ष्मी कराडकर यांनी व्यक्त केले .
आदरणीय पळसे साहेब यांनी महिलांना शुभेच्छा देत समाज परिवर्तनासाठी महिलांनी पुढे येऊन सर्वच क्षेत्रात काम करणे अपेक्षित आहे यासाठी अशा दिवसाची प्रेरणा घ्यावी असे त्यांनी आव्हान केले.
संचालक श्री संजय संकपाळ सर यांनी बँकेच्या विविध योजना सांगितल्या,नवीन सभासदांना नोंदणीसाठी आव्हान केले तसेच
बँक सभासद ठेवीदार व तालुक्यातील महिला शिक्षक शिक्षिका यांना गुलाब रोप भेट व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मनोरंजनात्मक खेळ व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन अशा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात आले होते .
कार्यक्रम नियोजनबद्ध व उत्तम व्हावा यासाठी महाबळेश्वर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ वैशाली कदम मॅडम, दिपाली हिरवे मॅडम, संगीता उत्तेकर, रूपाली कारंडे,अर्चना भिलारे,अर्चना कांबळे,वंदना शिंदे,निलम शेंडकर आधी महिला शिक्षिकांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन रईसा शेख मॅडम व सुजाता ढेबे मॅडम यांनी केले तर सौ सरस्वती ढेबे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिनिधी दीपक जाधव महाबळेश्वर
8275929314
Discussion about this post