सोनगीर प्रतिनिधी– अध्यात्म,आई-वडिलांची सेवा करा तोच खरा श्रीमंत,ज्येष्ठांचा आदर करा,व्यसनाधीन होऊ नये असा संदेश मुकेश महाराज पारगावकर यांनी भागवत कथेतून दिला.
सोनगीर येथील गुजर गल्ली मध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या भगवत कथाच्या आयोजनाने संपूर्ण पंचक्रोशीत भक्तीमय वातावरण निर्माण करत ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.
सोनगीर येथील अ.वासी हरिकृष्ण ज्ञानेश्वर गुजर व अ.वासी सुरेश मिठाराम पटेल, अ.वासी बनारसबाई सुरेश पटेल यांच्या पुण्यातीथी निमित्त ह.भ.प. श्री मुकेशजी महाराज पारगांवकर (झी टॉकीज फेम) यांच्या मधुर वाणीतून ग्रामस्थ कथा ऐकुन तृप्त होत आहेत. ज्ञानेश्वर सहादू गुजर , रेखाबाई ज्ञानेश्वर गुजर व घनश्याम ज्ञानेश्वर गुजर , भाविता घनश्याम गुजर यांनी या कथेचे आयोजन केले आहे.
भागवत कथेच्या सहाव्या दिवसाची आरती चे प्रमुख मानकरी लोकप्रिय आमदार रामदादा भदाणे यांच्या मातोश्री ज्ञानज्योती भदाणे माजी पं.स.सभापती , राजेंद्र भाऊ महाजन संचालक महाजन हायस्कूल धुळे,आर.के.माळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष), लखन ठेलारी उपसरपंच सोनगीर ग्रा.पं ,भटु धनगर सदस्य वि.का.सोसायटी सोनगीर ,नाना काशीनाथ महाजन , शानालाल माळी , युवराज गोकुळ माळी,किशोर पाटील माजी सरपंच दापुरा ,दीपक शांताराम पाटील, डॉ गौरव पारेख , दीपक रमेश पाटील , एल.बी.चौधरी पत्रकार दैनिक सकाळ, प्रमोद बापू धनगर पत्रकार आपला महाराष्ट्र, रोशन जैन पत्रकार दिव्य मराठी, श्यामकुमार महाजन , दीपक गुजर, जितेंद्र बागुल, महेंद्र नारायण पटेल (कुसुंबा) , कैलास पटेल ,राजेंद्र चौधरी बडोदा ,सुहानंद गुजर ,यज्ञेश गुजर , विश्वनाथ पाटील कुसुंबा,जितेंद्र पाटील , छोटू गोसावी, जितेंद्र पटेल, सतीश पाटील,किरण पाटील , पमु मामा,डॉ आपटे , दिलीप गुजर (साखरे) यांनी आरती केली यावेळी. शितल अकॅडमी सोनगीर चे संचालक सागर पटेल सर यांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले. व कथेमध्ये श्रीकृष्ण, रुख्मिणी, लक्ष्मी नारायण, ब्रम्ह सरस्वती, बाल श्रीकृष्ण, असे वेशभुषा धारकांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले व ज्ञानज्योती भदाणे यांनी देखील कथेत गो मातेची पूजा केली व कुसुंबी येथील श्री राजेश्वर (बाळु) गुजर यांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली.
दि.7 मार्चला या कथेचा समारोप होणार असून दि. 8 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व श्रीमद् भागवत कथेचे सूत्रसंचालन शितल अकॅडमीचे संचालक सागर पटेल यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
Discussion about this post