



हवेली - पुणे प्रतिनिधी अनिल वाव्हळ- 8830251992
साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर मधील राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना “रासायनिक रंगाच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम व नैसर्गिक रंग वापरण्याचे महत्व इत्यादी विषयी सविस्तर माहिती सांगून होळी तसेच धुलीवंदन साजरी करीत असताना प्रत्येकाने नैसर्गिक रंगाचाच वापर करावा, रासायनिक रंगाचा वापर करू नका, पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याचे संवर्धन करा असा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार करून सण साजरे करावेत असा संदेश देण्यात आला.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव म्हणाले; ”प्रत्येकाने कुठलाही सण साजरा करतांना पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे गरजेचे आहे. होळी तसेच धुलीवंदन साजरा करत असताना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग वापरणे आवश्यक आहे व आपण इतरांनाही नैसर्गिक रंग वापरण्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे, त्यामुळे रासायनिक रंगाचा वापर कमी होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे व निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक पद्धती तसेच वस्तूंचा वापर केला पाहिजे,”
या कार्यशाळेचे आयोजन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, विज्ञान विभाग प्रमुख डॉ धनाजी सावंत, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,गजेंद्र शिंदे,
राष्ट्रीय हरित सेनेचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील शिक्षिका संगीता गायकवाड,धनश्री पाटील, तेजस्विनी गायकवाड,राणी मोरे, सुप्रिया पाटील, सारिका बोरकर व यास्मिन शेख उपस्थित होते..
Discussion about this post