श्री. रवळनाथ हौसिंग, झेप अकॅडमी, श्री महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी यांच्य संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
आजरा: प्रातिनिधी,
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी, ज्ञानदीप प्रबोधनी संचलित झेप अकॅडमी आणि श्री महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान आणि यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी पुणे येथील ख्यातनाम लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या मा. दीपा देशमुख, यांनी मला भेटलेल्या स्त्रिया तर स्वदेश सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मा. धनश्री पाटील यांनी महिलांचे सामाजिक समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले , उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, श्री. महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उत्कर्षा पोतदार, रवळनाथचे सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह रवळनाथ संस्था समूहातील सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post