सिल्लोड :
शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी नगर परिषदने क्रेन देण्यास नकार दिला होता, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असून, क्रेन देण्यास नकार देणारे सिल्लोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रफिक कंकर यांना निलंबित करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पांच्याकडे केली. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
शहरात १९ फेब्रुवारीला रात्री शिवजयंतीची मिरवणूक सुरु असताना सिल्लोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रफीक कंकर यांनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेन देण्यास नकार दिला होता. यामुळे शहरातील भगतसिंग चौकात भाजप पदाधिकारी व शिवप्रेमींनी दोन तास तिव्या आंदोलन केले होते. यानंतर शहर पोलिसांनी मध्यस्थी करून हा घाद मिटवला, यानंतर दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.भाजपाच्या शिष्टमंडळाने यापूर्वी २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी स्वामी यांची भेट घेऊन, मुख्याधिकारी रफीक कंकर यांचे निलंबन करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. यामुळे
शुक्रवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.येत्या दहा मार्चपर्यंत कारवाई केली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष श्री अशोक गरूड,प्रदेश सचिव सुरेश बनकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मीते, जिल्हाटपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया मनोज मोरेल्लू आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीचा पुनरुच्चार करून, यावर कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा या वेळी दिला.
पोलिसांकडून अहवाल सादर :
१९ फेब्रुवारीच्या रात्री नगर परिषदने क्रेन देण्यास नकार दिल्याने भाजप पदाधिकारी व शिवप्रेमींनी दोन तास ठिव्या दिला. यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाला. मात्र, शहर पोलिसांनी ‘महावितरण’ची शिडी उपलब्ध करून देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीच्या घटनेचा अहवाल पोलिस अधीक्षकांना पाठवला होता..
Discussion about this post