
प्रशांत पाटील / संपादक अहिल्यानगर –
अहिल्या नगर जिल्ह्यातील कोल्हार येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेने जागतिक महिलादिनी कोल्हार गावातील आरोग्य आणि स्वच्छता सेविकांचा प्रवर हायस्कूलमध्ये मानसन्मान सोहळा पार पडला. महिला दिनाचे औचित्य साधून शाळा आणि समाज यांना एकत्रित आणणाऱ्या विविध घटकांचा विद्यालय नेहमी माणसांना करीत असते. प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक करून सर्व महिला दिनानिमित्त स्थानिक स्वच्छता सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिस्टर्स तसेच इतर कर्मचारी यांचा सत्कार केला. स्थानिक ग्रामपंचायतीतील सेविकांना देखील या वेळी आमंत्रित करण्यात आलेले होते त्यांचा देखील येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षिका सौ जया खर्डे आणि सौ स्वप्नाली घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी जागतिक तसेच भारतीय प्रसिद्ध महिलांच्या व्यक्तिरेखा सर्वांसमोर सादर केल्या. याप्रसंगी उपस्थित सेविकांचे मनोरंजन पर विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्राचार्य सुधीर मोरे यांनी समाजातील महिलांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे नमूद करताना प्रत्येकाच्या जीवनातील महिलांचे योगदान अमूल्य असल्याचे आणि पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया देखील खांद्याला खांदा मिळवून आपले अमूल्य योगदान देत असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटक हा महिलांचा कायम ऋणी राहील असे देखील सांगितले. सर्व उपस्थित महिला सेवकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनिता पानकर यांनी केले तर आभार सौ दिपाली दळे यांनी मानले..
Discussion about this post