
बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची खंडणी वसुली मध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे निर्दय अमानुष हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपींना व सह आरोपींना जलद गतीने न्यायालयात सुनावणी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे निर्गुण हत्या ही घटना अतिशय दुर्दैवी व मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना असल्यामुळे सकल मराठा समाज बांधव व महागाव तालुका सरपंच संघटना यांच्या वतीने या घटने च्या निषेधार्थ आज दिनांक 9 मार्च २०२५ रविवारला महागाव शहर व संपूर्ण महागाव तालुका बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तरी सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठानने बंद करून सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे .
निषेध व बंद करण्याचे निवेदन पत्र माननीय तहसीलदार साहेब व माननीय ठाणेदार साहेब यांना उदय नरवाडे व महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकने. डॉक्टर संदीप शिंदे. प्रमोद जाधव नगरसेवक सुजितसिंह ठाकूर.मा. नगरसेवक नारायण शिरबिरे. पंकज देशमुख. व इतर मान्यवरांनी निवेदन दिल्याने.
या निवेदनाला हिवरा( संगम ) येथील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून चांगलाच प्रतिसाद दिल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना व राजकीय पाठबळ असलेल्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी व अशा प्रकारचे समाजात पुन्हा गुन्हेगार व्हायला नको या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कार्यवाही व्हावी अशी मागणी सकल मराठी समाजातूनच नाही तर प्रत्येक समाजातील नागरिकाकडून केल्या जात आहे. संघटित गुन्हेगारीच्या घटना आज समाजामध्ये वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत नव्हे तर अवैध धंद्यांमध्ये काही राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे का बीडमध्येच नव्हे तर इतर भागात हि जे अवैध धंदे चालत असतात यामागे हि राजकीय नेत्यांचा हात किंवा काही कर्मचाऱ्यांचा हात आहे का असाही प्रश्न सर्वसामान्य जनते तिल नागरिकाला पडत असल्याचे नागरिकांमधून कानी पडत आहे. त्यासाठी समाजामध्ये होत असलेले संघटित गुन्हेगारी हे कमी व्हायला पाहिजे अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे..
Discussion about this post