
दक्षिण सोलापूर येथील विंचूर येथे विविध ठिकाणी महिला दिन साजरी करण्यात आली आहे.या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ. सारिका बाळासाहेब पाटील व उपसरपंच पद्मवती फुलारी उपस्थित होते. या वेळी श्री पंचाक्षरी विधामंदीर विंचूर . अंगणवाडी क्रमांक -4तर जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत विविध बचत गटातील महिला जागतीक महिलादिनानिमीत विविध स्पर्धा घेण्यात आले.या वेळी उखाणे,संगीत खुर्ची, रागोळी स्पर्धा आधी झाल्या. यावेळी दोन मुलीवर कुटुंब नियोजन करणारया महिलाना संरपंच बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विशेष सतकार करण्यात आला या मध्ये सौ.पायल माने,भाग्यश्री चव्हाण, लक्ष्मी वरभर,चंदनाबाइ कांबळे, सपना फडतरे,श्रावणी अंकुशे याचा समावेश आहे.
या वेळी बोलताना सौ.सारिका पाटील म्हणाले स्त्री म्हणजे वास्तव्य,स्त्री म्हणजे मातृत्व,स्त्री म्हणजे पावित्र्य,स्त्री म्हणजे कतृत्व आहे. महिला कशी असावी जिजाबाई, सावित्रीबाई फुले,झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी असावी.
आदी माहिती सौ.पाटील यांनी दिली या वेळी गावतील महीलानी 8मार्च रोजी जागतीक महिलादिनानिमीत जन्म लेल्या शिवानी व्हनसुरे या एक वर्षाची मुलीची वाडदिवस साजरा केला. यावेळी अनुराधा पाटील, जयश्री फुलारे,पद्मवती कोठे,राजश्री कांबळे,राणी कोळी,मनिषा मोरे,पुजा माने,लक्ष्मी कोळी,चंदा कांबळे, कविता व्हनसुरे, विमला बेनुरे,माहदेवी माने,भिमाशंकर फुलारी,मुख्याध्यापक बसवराज बनपुरे, शालेय अध्यक्ष बसवराज बिराजदार, शाताराम कोळी,तुळशीराम शेतसंदी,अशोक साळुंखे,शिक्षीका मिनाक्षी नळे, सुनंदा जमादार,धानाप्पा व्हनसुरे उपस्थित होते..
Discussion about this post