
शिरोळ तालुका प्रतिनिधी/ तात्यासाहेब शिरगावे, 9730720307
सांगली आणि कोल्हापूरसह शिरोळ तालुक्यामध्ये येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासंदर्भात जागतिक बँकेच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूटशन
फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) यांच्या पुढाकाराने डीपीआर बनवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी कार्यशाळेच आयोजन केलं होतं. त्यामध्ये शिरोळ तालुक्याची बाजू मांडताना अंकुश आंदोलनाचे अधिकारी.
आपल्याकडे पूर्वी महापूर येत होते. पण लगेच पूर ओसरून जायचा. पण 2005 नंतर या ठिकाणी महापूर पंधरा पंधरा दिवस साचून राहु लागला. याला कारण कर्नाटकचा पाण्याचा अतिहव्यास आणि आम्ही केलेली विकास कामे.
ज्यांच्यामुळे नदीच्या पात्रामध्ये अडथळे निर्माण झाले. जसे की रस्ते, पुल ,त्यांचे भराव कमी करून त्या ठिकाणी जास्तीचे गाळे, फ्लायओव्हर बाधणे,पात्रातील गाळ कमी करण्याची काम करण्याची गरज असल्याचे माडंले.
तसेच कर्नाटकातील मांजरी अंकलीचा भराव काढणे , कर्नाटक शासनाच्याअलमट्टी आणि हिप्परगी धरण्याच्या पाणी साठ्याच्या धोरणाबाबत ठोस भूमिका घेऊन विरोध करण्याची भूमिका मांडली.
यावेळीआंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे , तालुका अध्यक्ष दीपक पाटील,रशीद मुल्ला, महेश जाधव, सारथी महाराष्ट्राचे प्रतिनिधी तात्यासाहेब शिरगावे इ. उपस्थित होते..
Discussion about this post