

वरोरा व भद्रावती तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकाम केवळ रेतीच्या अभावामुळे अपूर्ण अवस्थेत आहे. काहींचे अर्धवट बांधकाम आहे, तर काही कुटुंबांना उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना व्हावी म्हणून वरोरा व भद्रावती तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी (SDO) यांची भेट घेऊन शासकीय दरात रेती उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
✅ गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासकीय दरात रेती मिळाली, तर त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होईल.
✅ शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा मिळेल.
✅ अपूर्ण घरे पूर्ण होतील व हजारो कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळेल.
यासंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, हीच आमची मागणी! 💪🏠
Discussion about this post