सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा ध्यास चळवळ व सामाजिक बांधिलकी म्हणून आज अनेक पत्रकार ऊन वारा पाऊस झेलत आपली प्रामाणिक पत्रकारिता पणाला लावून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्यायकासाठी आपली लेखणी जिझवतात अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पत्रकारिता करत असताना
अनेक वेळा पत्रकार आजारी पडतात पत्रकारांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो कधीकधी पत्रकारांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी अनेक आर्थिक स्वरूपाच्या अडचणी निर्माण
होतात पत्रकारांना आजारी पडल्यावर तातडीने रक्ताची त्याचबरोबर प्लाजमाची गरज भासते कधी कधी वेळेत रक्तपुरवठा न मिळाल्याने एखाद्या पत्रकार बांधवांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत पत्रकार सुरक्षा
समिती वतीने सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राचे चेअरमन मा वैभव राऊत यांची भेट घेऊन पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे
जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर अध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे वकील दिलीप जगताप मेहबूब कादरी योगेश स्वामी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
*पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा नक्कीच विचार करू वैभव राऊत* पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना जनतेसमोर आणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ऊन वारा पाऊस झेलत पत्रकारिता करीत असतात
अशा प्रामाणिक पत्रकारांना महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्रामधून विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत नक्कीच विचार करू अशी ग्वाही महात्मा बसवेश्वर रक्तपुरवठा संकलन केंद्राचे चेअरमन श्री वैभव राऊत यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.
Discussion about this post