बातमीदार-कु.गणेश राम यादव,आज दी. 9/3/2025 रोजी आय.सी.सी. चॅम्पियन ट्रॉफी 2025 फायनल मॅच भारत वि. न्युझीलंड सामना खुप रोमांचक लढत टी.व्ही.व मोबाईलवर जगातील खुप प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
न्युझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 251/7 धावा केल्या असुन, मिचेल आणि ब्रेसवेल यांनी अर्धशतक झलकावून आपल्या संघांसाठी चांगले प्रदर्शन केले आहे.
भारताकडून गोलंदाजी करताना यादव आणि चक्रवर्ती यांनी आपल्या संघांसाठी 2-2 विकेट घेतल्या असुन गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केलेले आहे. भारतीय गोलंदाजी माऱ्यापुढे न्यूझीलंडची 251/7धावा करता करता वाईट अवस्था झाली.
भारताने फलंदाजीत न्यूझीलंडच्या 251 धावांचा पाठलाग करताना चांगलीच टक्कर देऊन 254/6 धावा 49 षटकात पूर्ण करून भारतीय क्रिकेट टीमने भारत देशाला आय.सी.सी. चॅम्पियन ट्राफी जिंकून दिली आहे.
भारतीय फलंदाजांनी फलंदाजी करताना खूपच संय्यम पाळला. फलंदाजीत रोहितने 76धावा, श्रेयसने 48धावा, राहुलने 34धावा, केल्या असुन ह्या धावा भारतीय संघासाठी मोलाच्या ठरल्या आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा रोहित शर्मा मॅन ऑफ दि मॅच विनर झाला असून, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र मॅन ऑफ दि सिरीज विनर झाला आहे. आय.सी.सी. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघ चॅम्पियन झाला आहे आणि न्यूझीलंड संघ रनर अप झाला आहे.
दोन्ही संघ अनुक्रमे एक आणि दोन नंबरचे बक्षीस पात्र झालेले आहेत.न्युज रिपोर्टर-रायगड/पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार- कु.गणेश राम यादव-मो.8483014657/व्हा.7218101984


Discussion about this post