नेर ✍️ प्रतिनिधी,विजय बारस्कर दि. 3 मार्च पासून संगणक परिचालक यांनी संप पुकारलेला आहे त्या संपाची पडसाद म्हणून ग्रामीण जनतेवर पडत आहे.
प्रत्येक कार्यालयीन काम हे संगणकातून आज निघत असतात परंतु संगणक चालक जर तिथे उपस्थित राहणार नाही ते जर संपावर जाणार तर मग ते काम करणार तरी कोण या तत्त्वावर कोणीही दाखले देत नाही किंवा कोणतीही शासकीय ग्रामपंचायत मधून योजनेपासून तर कार्यालयीन दाखले नोंदी गावातील आठ अ असे कितीतरी प्रकारचे दाखले या संगणकातून निघत असतात परंतु संगणक परिचालक संपावर गेल्यामुळे जनतेला असुविदेचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आक्रोश होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यामध्ये 28 हजार संगणक परिचालक आहे आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात संगणक परिचालक इमानदारीने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले पण त्याचा मोबदला म्हणून मानधन त्यांना चार महिन्यापासून दिलेले नाही त्यामुळे तीन मार्चपासून संपाचा मार्ग पत्करावा लागला आणि ते आज पगार मिळे पर्यंत संपावर राहणार अशी त्यांनी शासन दरबारी माहिती दिली.
ऑक्टोंबर 2024 पासून त्यांचे मानधन त्यांना मिळालेले नाही. देशाचे डिजिटल इंडियाचे स्वप्न महाराष्ट्रात काम करणारे संगणक परिचालक करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या विकासाला हातभार लावणारे संगणक परिचालक यांनी स्पष्ट निवेदन दिलेले आहे की आमचे मानधन मिळाल्याशिवाय आम्ही कामावर रुजू होणार नाही
याची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी असे मत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यवतमाळ जिल्हा तालुका नेर अध्यक्ष, श्री निखिल गजानन बायस्कर व सचिव श्री संदीप अरुण तिखे यांनी माहिती मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती नेर येथे अर्जाद्वारे दिली. व वरिष्ठांना प्रतिलिपी दिल्या.
अर्ज देताना सर्व त्यांचे संगणक परिचालक होते. तरी या गोष्टीची शासन दरबारी मानधनाची विल्हेवाट करावी असे त्यांनी मत व्यक्त केले.

Discussion about this post