कंधार : येथील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम ‘राजमाता जिजाऊ’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी तालुक्यातील होम गार्ड महिला तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाश राव घाटे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहराध्यक्ष जीवनराव घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, माजी नगरसेवक आसिफ शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख खरेदी विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे,
जयमंगलताई औरादकर, कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस अनुसया ताई केंद्रे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष आम्रपाली केकाटे, वंदना डुमणे, निलेश गौर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी
सभापती बालाजी पाटील मारतळेकर, मधुकर पाटील डांगे, राजकुमार केकाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Discussion about this post