प्रा. दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी )
स्वतः राहुल गांधी यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली, तेव्हा अनेकांसाठी हे नाव नवखे होते. मात्र, साधेपणा आणि जनसामान्यांशी असलेली नाळ हेच त्यांचे खरे ओळखचिन्ह आहे.
काल त्यांचा थेट फोन आला— “मी हर्षवर्धन सपकाळ बोलतोय, मला आनंदग्राममध्ये मुक्काम करायचा आहे.” एक मोठा नेता पंचतारांकित हॉटेलऐवजी आनंदग्राम सारख्या आश्रमात राहणार, तिथलं हातच जेवण करणार, हा आनंदग्राम साठीचा अभिमानाचा क्षण होता.



आजही अनेक लोक आनंदग्रामकडे येताना नाक दाबून येतात. येथे आल्यावर काही जण पाणीही पित नाहीत. पण हर्षवर्धन सपकाळानीं आमच्या हातचे भाकर-ठेचा आणि बेसन आनंदाने स्वीकारले. तसेच येथील आमच्या परिवारातील अवघ्या ६ दिवसाची पाहुनी ‘सावित्रीला’ पण प्रेमाने जवळ घेतले. लाईटच्या ये-जा असलेल्या परिस्थितीतही त्यांनी कुठलाही विशेष आग्रह धरला नाही. कुठलाही अहंभाव नाही, कुठलीही विशेष डिमांड नाही—फक्त माणुसकीचा स्पर्श!
यावेळी खासदार रजनी ताई पाटील, अशोक दादा, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल दादा सोनावणे पाटील, दादासाहेब मुंडे, राख साहेब व काँग्रेस चे इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा माणूसपण जपणाऱ्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष नक्कीच अधिक मजबूत होईल, सामान्य जनतेत रुजू शकेल आणि लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल. त्यांच्या कार्यकाळात पक्षाच्या उत्तुंग यशासाठी आनंदग्रामच्या अनेक अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्या.
Discussion about this post