
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हा शाखा यवतमाळ द्वारे नियोजित संघटना बांधणी सभा यवतमाळ येथील स्थानिक शासकिय विश्रामग्रुहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशीकांत लोळगे होते.
सभेत सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ माँसाहेब, अहिल्यादेवी होळकर मा.सावित्री यांच्या प्रतिमेचे पुजन जेष्ट समाजसेविका आदरनिय दिपांजली गावित तथा महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनयना येवतकर तथा समस्त उपस्थित महिला भगिणींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी “बंजारा वेषभुषा,महाराष्ट्रियन,तथा अनेक सांस्कृतिक वेषभुषेत महिला भगिणींनी प्रचंड उपस्थिती दर्शविली.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना एक महिला जिवनाःत अनेक नात्यांची भुमिका अगदी व्यवस्थित-चोखपणे कशी निभवते याची अनेक उदाहरणे जिल्हाध्यक्ष शशीकांत लोळगे यांनी दिली.
यानंतर जिल्हाध्यक्ष शशीकांत लोळगे,जिल्हासचिव पवन थोटे,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.दिनेश विडूळकर यांचे द्वारे जिल्हा कार्यकारिणीसाठी उपस्थितां पैकी जिल्हा पदाधिकारी पदावर निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी हरिभाऊ राऊत यांची जिल्हा सल्लागार पदी,अडव्होकेट अरुण सांगळे यांची जिल्हा विधी सल्लागारपदी,अनील जयसिंगपुरे यांची जिल्हा सहसचिव पदी,सौरभ ठोकळ यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी, श्रीमती शितल तेलंगे यांची जिल्हा महिला प्रतिनिधी पदी,विलास अवघड यांची ओबीसी रेमंड कर्मचारी संघ प्रमुख पदी,तर प्रकाश तिजारे,डॉ.चंद्रशेखर बोबडे, सुरेश भावेकर यांची जिल्हा संघटक पदी निवड करुन सर्व निवड झालेल्या जिल्हा पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी,अडव्होकेट अरुण सांगळे,पी.डी.ठोकळ,दिनेश विडूळकर,पवन थोटे,सुरेश भावेकर,डॉ.आनिल बेंद्रे,रविंद्र सावरकर,हरिभाऊ राऊत, श्रीमती शितलताई तलंगे,देव डेबरे,अनील जयसिंपुरे,सौरभ ठोकळ,विलास अवघड, युवराज पत्रे,जय तिजारे, चंद्रशेखर बोबडे,नरेश भितकर, प्रविण थुल,यांसह अनेक ओबीसी कर्मचारी अधिकारी बंधू भगिणींसह,दिपांजली गावित,सुनयना येवतकर, शितल घावडे,कविता पांढरकर, सोनाली देशमुख,भावना नव्हाते,सपना घावडे,सीमा ठोकळ, अबोली डिवकर,विद्या भोयर,संध्या वानखडे,कांता लाहे,यांसह शेकडो महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली.आभार प्रदर्शन ओबीसी कर्मचारी आधिकारी संघाचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पवनजी थोटे यांनी केले..
Discussion about this post