


प्रा.एम.एम.सुरनर ✍️
दिनांक 08 /03/2025 वार शनिवार मौजे लिमला ता पूर्णा जिल्हा परभणी येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारे आयोजित कला लोक कलावंतांची या कार्यकर्माचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रबोधन चळवळीचा बुलंद आवाज
प्रा एम एम सुरनार सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला जिजाऊ, सावित्रीबाई , आहिलामाई रमाई या महानायकांचे प्रतिमा पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर गावातील सर्व प्रतिष्ठित महिलांचे आणि जयांचे कार्य हे समाजोपोगी आहे अश्या सर्वच महिलांचा सन्मान गावातील ग्रामविकास अधिकारी मा राठोड सर आणि गावाचे प्रथम नागरिक प्रज्ञाताई गायकवाड आणि सर्व आयोजकाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर प्रा एम एम सुरनार सर यांनी महिलांना येतोचित मार्गदर्शन केले. सर पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक महिलांना या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे हक्क आणि अधिकार भारतीय संविधानात दिले आहेत परंतु आज ते अधीकार मात्र लोकांपर्यंत पोचताना दिसत नाहीत. अशांही खंत व्यक्त करत आपला भारत देश हा महान आहे किंतु तो महिलांना देवी दुर्गा आणि अनेक उपमानी बोलत असतो.परंतु त्यांना मान सन्मान आणि अभिमान बाळगण्यास मज्जाव करत असताना दिसत असतो तेंव्हा हा सर्व विचार बदलला पाहिजे. यासाठी आपण अश्या प्रबोधनात्मक कार्यकर्माचे आयोजन करून महिलांना वेळोवेळी त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून दिले पाहिजे..
आज आपल्या देशात महिलांना पावलो पावली अन्याय अत्याचार अश्या कित्येक अमानवीय प्रसंगाणा सामोरे जावे लागतोय त्यासाठी हे बदलण्यासाठी अगोदर आपले वैचारिक परिवर्तन झाले तरच माँसाहेब जिजाऊ यांनी जे संस्कार देऊन या महाराष्ट्रला एक नाही तर दोन दोन छत्रपती दिले.ते केवळ स्वतःच्या प्रेरणादायी आणि तर्क शुद्धा विचाराने म्हणून आज देखील त्यांच्या विचारांची गरज आपल्या महाराष्ट्राला आहे हे वास्तविक आहे. याकरिता सावित्रीमाई ने अतिशय त्यागाने बलिदानाने आणि ज्योतिबाच्या साहाय्याने आपणास जो शिकण्यासारखे महान शास्त्र आणि शस्त्र निर्माण करून दिले आहे त्याचा आपण योग्य विचार आणि अनुकरण करून आपण महिलांनी आपल्या मुलींना राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवणे खऱ्या अर्थाने महिलांना सबल करण्याचे काम आपण या कार्यक्रमचया माध्यमातून केला पाहिजे.
असे प्रतिपादन आपल्या सडेतोड आणि निर्भीड वाणीतून करत अनेक उदहारणे आणि दाखले देत उपस्तिथंच्या मनात करत आपला देशात महिलांना पूजले जाते तर त्यांच्या वार होणारे शारीरिक मानसिक छळ का थांबत नाही हा ही सर्वात मोठा प्रश्न उभा केला आणि सर्व विदयार्थी गावकरी आणि उपस्थित जनसमुदायास प्रबोधनं केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ड्रा सिद्धार्थ मस्के सर यांनी भुसावले तर संचलन मा शिंदे सर तर आभार मा राठोड सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर सर्व कर्मचारी वर्गाणी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला..
Discussion about this post