निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर.
पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत पिंपळकोठा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी उघडीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. की पिंपळखुटा येथील पशुपालन ज्ञानेश्वर मोतीराम मालवकार यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी रोजी संध्याकाळी चार ते पाच धुरे शेतात कांदा चाळीच्या लोखंडी अँगल ला बांधून घरी परतले मात्र रात्रीच्या वेळेस बिबट्याने एका बैलावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात बैल हा ठार झाल्याने पशुपालकाचे 35 हजार रुपये असे नुकसान झाले आहे.ही घटना पहिली नव्हे तर अशा या भागात अनेक घटना घडलेल्या आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच आलेगाव वन विभागाला मिळतात त्यांनी घटनास्थळ धाव घेऊन ठार झालेल्या बैलाचा पंचनामा केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने पशुपालकाचे 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालकाकडून होत आहे..
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत :
पिंपळखुटा परिसरात अनेक वेळा ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होते.त्यामुळे पिंपळखुटा परिसरात शेतकऱ्यांमध्ये नेहमीच बिबट्याची दहशत कायम असते त्यामुळे वन विभागाने बिबट्याला
जेरबंद करून शेतकऱ्यांना दहशती पासून मुक्त करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे..
Discussion about this post