
प्रा. दिलीप नाईकवाड,
सिंदखेडराजा( तालुका प्रतिनिधी)..
क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त, विरंगुळा भवन देऊळगाव राजा येथे तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, व जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष जिजेबा मापारी मामा होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी प्रकाश खांडेभराड ,अध्यक्ष सहकार महर्षी भास्करराव शिंगणे वाचनालय तसेच जनसेवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी रमेश नरोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाला जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मापारी मामा, उपाध्यक्ष प्रकाश खांडेवाड , पदाधिकारी रमेश नरोडे , सचिव गोविंद भाऊ बोरकर, दिनकर भाऊ जाधव उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गोविंद भाऊ बोरकर यांनी केले..
Discussion about this post