
दारफळ/ प्रतिनिधी
दिनांक – १०.०३.२०२५
माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील नवभारत विद्यालयात जागतिक महिला दिनाचेऔचित्य साधून८मार्च रोजी आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिजोती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर शिंदे यांनी केले.प्रस्ताविकात कार्यक्रमाच्या उद्देशाबरोबरच आजच्या परीस्थितीत स्त्रियांनी कणखर भूमिका घेतली पाहिजे त्यासाठी विद्यार्थिनींनी या वयापासूनच सक्षम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी विद्यालयातील सहाशिक्षक गणेश भोसले सरांनी उच्च पदावर विराजमान झालेल्या १० महिलांच्या कर्तृत्वाचा उजाळा घेतला.चुकीच्या ठिकाणी ठणकावून विरोध करावा असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर धावारे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षिका स्वाती कुंभार यांनी मुलींना मार्गदर्शन केले.स्त्रियांना सामाजिकआणि शैक्षणिक क्षेत्रा मध्ये दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी दिली.नवभारत विद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाकाकडून आयोजित विशेष कार्यक्रमात महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी मुलांकडून सूत्रसंचालन करण्यात आहे.याप्रसंगी वेशभूषा स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा यांचे आयोजन केले होते.कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षिका स्वाती कुंभार ,अनिता माळी, रचना जाधव, स्वाती मोरे यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनआठवीतील विद्यार्थी दिग्विजय गोडगे याने केले तर आभार सुदर्शन गायकवाड याने मानले.
सारथी महाराष्ट्राचा,
दारफळ प्रतिनिधी,
अशोक शिंदे
मो – +91 97669 76263
Discussion about this post