
उदगीर (श्रीधर सावळे ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उदगीर नगरपरिषदेचे मुख्याध्यकरी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
दि. ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ :०० वा स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ व माझी वसुंधरा ५.० अंतर्गत महिला पदयात्रा आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांनी महिलांना शहर स्वच्छते करीता योगदान द्यावे आपण आपले घर, अंगण, परिसर स्वच्छ ठेवता त्याप्रमाणेच ओला सुका व घातक कचरा वेगवेगळा करून कचरा घंटागाडीमध्येच द्यावा, इतरत्र शहरांमध्ये उघड्यावरती कचरा टाकू नये. असे आवाहन करत महिला पदयातत्रेस हिरवी झेंडी दाखवली. सदर पदयात्रा न. प. कार्यालय – चौबरा- हनुमान कट्टा – पोष्ट ऑफिस – न.प.कार्यालय या मार्गाने संपन्न झाली. या दरम्यान महिलांनी स्वच्छता, बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ उदगीर सुंदर उदगीर यादी घोषवाक्य देत परिसर दुमदुमला.
या पदयात्रेत नगरपरिषद कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई मित्र, महिला बचत गट सदस्य यासह छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय उदगीर चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
पदयात्रेत सहभागी महिला अधिकारी कर्मचारी, महिला बचत गटाच्या सदस्या, विद्यार्थिनी यांच्या हस्ते मुख्य रस्त्याच्या दुभाजका मध्ये वृक्षारोपण संपन्न झाले.
सकाळी ११:३० वा नगरपरिषद कार्यालय येथे महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय कार्यक्रमाचा निर्देशानुसार महत्वाचा भाग म्हणून महिलांच्या तक्रारी व सूचना या कळविण्या करीत उपमुख्याधिकारी सतिश बिलापट्टे यांच्या हस्ते पिंक बॉक्स चे फित कापून अनावरण केले. त्यावेळी कार्यालयातील कोमल केंद्रे, विजया येलगुलवार, राधा जमाले, सोनिया गायकवाड, दिपीका अनकल्ले, माया बेदरे, कल्पना गायकवाड, विमल विरकपाळे आदी सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत बांधकाम परवानगी मिळून देखील अद्याप बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांची बैठक नगरपरिषद सभागृहामध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये जाधव यांनी उपस्थितांना आवाहन करत पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकाम सुरू करावे तसेच नवीन अर्ज करण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे व कार्य प्रणाली समजावली. यावेळी बांधकाम अभियांता गुरुप्रसाद लोणारे, अनिल कुरे, कोमल केंद्रे, सीएलटीसी मिसबहा सिद्धीकि यांच्या सह मोठ्यासंखेने प्रधानमंत्री आवास योजना शहरी चे लाभार्थी उपस्थित होते.
दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता नगरपरिषद उदगीर अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तळवेस येथे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व स्वच्छ्ता मित्र महिला कर्मचारी यांची आरोग्य तपासणी यामध्ये हिमोग्लोबीन इतर आवश्यक तपासणी करून औषधोपचार आणि घ्यावयाची काळजी विषय वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी बिरादार, डॉ. रोहिणी जाधव, डॉ. योगिश्री गुट्टे यांच्या सह संबंधित कर्मचारी यांनी आवश्यक ते उपचार केले.
त्यानंतर सकाळी ११:०० वा.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह तळवेस येथे कोविड काळात तसेच महामहीम राष्ट्रपती दौरा दरम्यान निपुन कामगिरी केल्याबद्दल स्वच्छता मित्र महिला कर्मचारी देवशालाबाई मादळे, कविताबाई अंधारे, मुद्रिकाबाई भालेराव व शिनाबाई कांबळे यांचा शाल, श्रीफळ देवून वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी बिरादार, डॉ. रोहिणी जाधव, डॉ. योगिश्री गुट्टे, स्वच्छ्ता विभाग प्रमुख विशाल आल्टे, बांधकाम अभियंता कोमल केंद्रे, विद्युत अभियंता राधा जमाले, करनिर्धारण अधिकारी सोनिया गायकवाड, स्वच्छ्ता निरीक्षक सरुबाई चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभारी स्वच्छता निरीक्षक सिकंदर शेख, अमित सुतार, उमाकांत गंडारे, विनोद रंगवाळ, शहर समन्वयक प्रफुल आदावळे , शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, विशाल गुडसुरकर आदींनी मेहनत घेतली.
Discussion about this post