

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी संस्थांचे सर्वेसर्वा श्री.परमपूज्य अण्णासाहेब मोरे दादा गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी मैदानावर चालू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोपास उपस्थित राहून आदरणीय गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेतले व शेतकरी बांधवांशी संवाद साधला.मराठवाड्यातील शेतकरी आणि युवकांसाठी हा महोत्सव नवीन संधी आणि मार्गदर्शन देणारा ठरेल. या महोत्सवात आधुनिक शेती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, उत्तम दर्जाची बियाणे आणि पूरक व्यवसाय यांची माहिती देण्यात येत आहे.. तसेच, पारंपरिक कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारी कृषी दिंडी आणि शेतीसाठी उपयुक्त यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात येत आहे.
तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकरी बंधूनी कृषी क्षेत्रात उन्नत प्रगती करावी अश्या शुभेच्छा देत संपूर्ण प्रदर्शनास भेट दिली.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वामी समर्थ सेवेकरी, पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post