
प्रतिनिधी-सोमनाथ भाऊ खोमणे
संभाजी राजे बलिदान दिन: स्वराज्यासाठी दिलेली सर्वोच्च आहुती
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांनी ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाच्या अत्याचारांना तोंड देत धर्म आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या शौर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाने संपूर्ण मराठा साम्राज्य प्रेरित झाले.संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर कवी, विद्वान आणि उत्कृष्ट प्रशासक देखील होते.
परकीय आक्रमकांशी त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि अखेर औरंगजेबाच्या कैदेत असतानाही आपल्या हिंदू धर्माशी प्रतारणा केली नाही. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण स्वराज्याला नवीन चेतना मिळाली आणि पुढे मराठ्यांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकवला.
आजच्या या बलिदान दिनानिमित्त, छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन! त्यांच्या बलिदानातून आपण प्रेरणा घेऊन समाज आणि राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे.जय जिजाऊ! जय शिवराय! जय संभाजीराजे!
Discussion about this post