राज्याचा कालचा सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर आता महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत सॅन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प हा नाविन्यपूर्ण योजनांनी आणि लोकसहभागातून तयार असेल असा विश्वास आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केलाय. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साधारण पुढील आठवड्यात प्रशासनाच्या महासभेत तो सादर केला जाणार आहे. सन २४-२५ चा अर्थसंकल्प ८२३ कोटी रुपयांचा होता मात्र यंदाच्या वर्षी यामध्ये १७७ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी आयुक्त शुभम गुप्तांनी जोरदार प्रयत्न सुरु ठेवले आहेत विविध प्रकारच्या अतिरिक्त खर्चाना कात्री लावण्यात येत आहे. सध्या मालमत्ता सर्वेक्षणामधून तब्ब्ल ५० हजारांवर मालमत्ता आढळून आल्या आहेत या मधून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकते बाजार परवाना नोंदणी साठी आयुक्त आग्रही आहेत यामधूनही चांगला महसूल अपेक्षित आहे. शासनाकडूनही महापालिकेला विविध योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो. सध्या महापालिका क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या सहकाऱ्याने ई बस साठी निधी मिळणार असून या प्रकल्पाची प्राथमिक सुरुवातही प्रशासकीय स्तरावर सुरु झाली आहे मिरज मध्ये या प्रकल्पासाठी जागाही उपलब्ध होत आहे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल. त्याचप्रमाणे शेरीनाला योजना ड्रेनेज योजनांना निधी मिळू शकतो. काही दिवसांपूर्वी आयुक्त शुभम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले होते अर्थसंकल्प तयार होत असताना नागरिकांनीही त्यांच्या संकल्पना मांडाव्यात निश्चितपणे चांगल्या संकल्पना या अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या जातील त्याप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्प हा लोकसहभागातून नाविन्यपूर्ण असेल यात शंका नाही.
Discussion about this post