
कागल प्रतिनिधी तानाजी उर्फ शहाजी परमणे (चिखली).
मुरगुड (ता. कागल) येथील मार्च अखेर १२५ कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केलेल्या मुरगूड येथिल श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मुरगूड मुख्य शाखेतील महिला कर्मचारी सौ. मनिषा सुर्यवंशी, प्रियांका कामत, श्रीमती लता कुंभार, संचालिका सौ. सुजाता सुतार, मनिषा शिंदे, कूर शाखेतील सौ. शैला शिंदे, वैशाली पाटील, प्रतिक्षा हाटोळ, कापशी शाखेतील प्रियांका रणवरे, आणि शाखा सावर्डे बु येथिल स्मिता खराडे अशा १० माहिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सभापती किशोर पोतदार, उपसभापती दत्तात्रय कांबळे, जेष्ठ संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नांडिस, चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र खराडे, रविंद्र सणगर, संचालिका सुजाता सुतार, सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post